Pradeep Pendhare
न्यूझीलंडच्या खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी संसदेत एक धाडसी पाऊल उचलल्याने ज्याची जगभरात चर्चा होत आहे.
'AI'च्या डीपफेक फोटो किंवा व्हिडिओंवर चिंता व्यक्त करताना त्यात होणाऱ्या फेरफारीकडे खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला.
लॉरा मॅकक्लूर यांनी 'AI' वापरून तयार केलेला स्वतःचे डीपफेक विवस्त्र फोटो घेऊन न्यूझीलंडच्या संसदेचे मोठ्या गंभीर मुद्याकडे लक्ष वेधले.
खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी हा फोटो संसदेत दाखवून 'AI' डीपफेकचा वापर करून कोणत्याही महिला किंवा मुलीच्या जीवनाशी आणि प्रतिष्ठेशी कसा खेळू होऊ शकतो, याकडे लक्ष वेधले.
खासदार लॉरा यांनी फोटो दाखवताना "हा माझा विवस्त्र फोटो आहे, पण तो खरा नाही. हा एक डीपफेक फोटो आहे, जो 'AI'च्या मदतीने तयार करण्यात आला आहे."
हा फोटो इतका खरा आहे की कोणीही फसेल, पण प्रत्यक्षात तो बनावट फोटो आहे. त्यामुळे डीपफेकविरोधात कायद्यात कडक शिक्षेची मागणी खासदार लॉरा यांनी केली.
न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च इथं 3 ऑगस्ट 1985 रोजी जन्मलेली लॉरा मॅकक्लूर ही एसीटी न्यूझीलंड पक्षाच्या सदस्य आहेत.
2023च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाच्या यादीतून संसदेत प्रवेश करण्यापूर्वी, फार्मसी तंत्रज्ञ आणि अग्निसुरक्षा सल्लागार म्हणून काम केले.