Rashmi Mane
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये 0.50% ची मोठी कपात केली आहे. आता रेपो रेट 5.50% झाला आहे. कर्जधारकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
रेपो रेट म्हणजे RBI बँकांना जेव्हा अल्पकालीन कर्ज देते, त्यावेळेस आकारला जाणारा व्याजदर. हा दर कमी झाला की बँकांचं कर्ज स्वस्त होतं.
रेपो रेट कमी झाल्यामुळे बँका कर्जाचे व्याजदर कमी करतील. त्यामुळे होम व ऑटो लोनवर EMI कमी होईल.
30 वर्षांसाठी 9% व्याजदरावर घेतलेले होम लोन
जुनी EMI: ₹40,231
नवीन EMI: ₹38,446
बचत: ₹1,785 प्रतिमहा
रेपो रेट म्हणजे रिझर्व्ह बँक बँकांना दिलेल्या कर्जावरील व्याजदर. याच दरावर बँका RBI कडून पैसे उधार घेतात.
देशातील महागाई, चलनवाढ आणि आर्थिक स्थिती नियंत्रित करण्यासाठी RBI रेपो रेटमध्ये बदल करते.
रेपो रेट कमी झाला की बँकांचे कर्ज स्वस्त होते. त्यामुळे लोकांना कर्ज घेणे सोपे आणि स्वस्त वाटते.