Vijaykumar Dudhale
पंकजा मुंडे पहिल्या पसंतीची 26 मते मिळवून विजयी झाल्या आहेत, त्यांचा दहा वर्षांचा राजकीय वनवास संपला.
भाजपचे मित्रपक्ष रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांना दुसऱ्या फेरीपर्यंत विजयाची वाट पाहावी लागली. त्यांनी दुसऱ्या फेरीत 26 मते घेत विजय मिळविला.
विदर्भातील फडणवीसांचे लाडके म्हणून ओळख असलेले परिणय फुके यांनीही पहिल्या पसंतीची 26 मते मिळाली. तेही पुन्हा विधीमंडळात येत आहेत.
देवेंद्र फडणवीस यांचे पिंपरी चिंचवडमधील निकटवर्तीय भाजपचे अमित गोरखे यांनीही पहिल्या पसंतीची 26 मते घेऊन विजय नोंदवला. ते पहिल्यांदाच विधीमंडळात येत आहेत.
भाजपचे योगेश टिळेकर यांनाही पहिल्या पसंतीची 26 मते मिळाली आणि ते विजयी झाले. पाच वर्षांच्या खंडानंतर ते पुन्हा विधीमंडळात दाखल होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांनी 23 मतांचा कोटा पूर्ण करीत, तर पक्षाचे कार्यालयीन कामकाज पाहणारे शिवाजीराव गर्जे यांनीही पहिल्या पसंतीची 24 मते घेत पहिल्याच फेरीत विजय मिळविला.
भावना गवळी-कृपाल तुमाने
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या माजी खासदार भावना गवळी आणि माजी खासदार कृपाल तुमाने या दोघांनाही पहिल्या पसंतीची 24 मते मिळाली, त्यामुळे दोघांचाही विजय पहिल्या फेरीतच झाला.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्या फेरीत 22 मते घेत कमाल केली. कारण त्यांच्या पक्षाकडे केवळ सोळाच आमदार होते. नार्वेकर यांनी दुसऱ्या फेरीत विजय मिळविला. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांना काँग्रेसच्या 37 मतांपैकी पहिल्या फेरीतच 25 मते मिळाली, त्यामुळे सातव यांनी पहिल्या फेरीतच विजय मिळविला.