Rajanand More
ट्रेनी IAS पूजा खेडकर आपल्या कारनाम्यांनी प्रकाशझोतात आल्या. त्यामुळे त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिमला बदली.
परवानगी नसताना ऑडी गाडीवर अंबर दिवा लावला, महाराष्ट्र शासन असे लिहिले. याच गाडीतून पुण्यात फिरत होत्या.
गाडीवर वाहतुकीचे विविध नियम मोडल्याबदद्ल 21 चलन आणि सुमारे 27 हजारांचा दंड आहे. पुणे पोलिस कारवाई करणार.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील सामान बाहेर काढून ताबा घेतला.
पूजा यांनी आपल्यासाठी स्वतंत्र कार्यालय, स्टाफ, वाहनाची मागणी केली होती. तसेच कर्मचाऱ्यांशीही चांगले वर्तन नसल्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा अहवाल.
पूजा यांचे ओबीसीतून आरक्षणासाठी दिलेले नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्रही बोगस असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यांची कोट्यवधींची संपत्ती आहे.
पूजा यांनी दृष्टी कमी असल्याचे प्रमाणपत्र देत दिव्यांग आरक्षण मिळवले. पण त्यांनी तपासणी करण्यास नकार दिल्याने आक्षेप घेतला जात आहे.
अटक केलेल्या नातेवाईकाच्या सुटकेसाठी पूजा यांनी दबाव टाकल्याचा अहवाल नवी मुंबई पोलिसांनी गृह विभागाला पाठवला आहे.
पूजा यांच्या IAS म्हणून निवडीबाबत चौकशीसाठी केंद्र सरकारकडून समिती स्थापन. दोन आठवड्यात अहवाल येणार.