Rashmi Mane
नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत महाराष्ट्रात तब्बल 1974 जागांची भरती जाहीर झाली आहे.
ही भरती कंत्राटी स्वरूपात केली जाणार असून राज्यातील पात्र उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी ठरणार आहे.
आरोग्य विभागाने या भरतीमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी (Community Health Officer - CHO) या पदासाठी भरती जाहीर केली आहे.
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 43 वर्षे असणार आहे. त्यामुळे जास्त वयामुळे संधी न मिळणाऱ्यांनाही याचा फायदा होणार आहे.
या पदांसाठी खालील पदव्या आवश्यक आहेत:
BAMS
BUMS
B.Sc Nursing
B.Sc in Community Health
मेडिकल विषयातील पदवी असणे अनिवार्य आहे.
अर्ज करण्यासाठी तुम्हाला फक्त अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल: nhm.maharashtra.gov.in
इथेच संपूर्ण जाहिरात, नियम आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती उपलब्ध आहे.