सरकारनामा ब्यूरो
बॉम्बस्फोटाचा तपास स्थानिक पोलीस/ATS (दहशतवाद विरोधी पथक सुरू करतात) करतात, पण घटनेचे गांभीर्य राष्ट्रीय सुरक्षेशी जोडल्यास NIA ची भूमिका सुरू होते.
तपास कधी हस्तांतरित होतो? जेव्हा स्फोटाचा संबंध आंतरराज्यीय किंवा आंतरराष्ट्रीय दहशतवादी गटाशी असल्याचे पुरावे मिळतात.
NIA बॉम्बस्फोटाचा 'मुख्य सूत्रधार' कोण आहे, हे शोधते तर, हा कट कुठे रचला गेला? कोण कोण सहभागी होते? मुख्य हेतू काय होता? इ. सखोल तपास करते.
'टेरर फंडिंग'चा माग NIA ची सर्वात मोठी ताकद म्हणजे 'टेरर फंडिंग' (दहशतवादाला होणारा आर्थिक पुरवठा) आणि आर्थिक व्यवहार तपासणे.'
आंतरराष्ट्रीय संपर्क तपासात परदेशी हात दिसल्यास, NIA थेट 'इंटरपोल'सारख्या परदेशी तपास यंत्रणांशी संपर्क साधते. (उदा. इंटरपोल, इतर देशांच्या तपास संस्था) संपर्क साधते. त्यांना राज्यांप्रमाणे मर्यादा नसतात.
'स्लीपर सेल' नेटवर्क उद्ध्वस्त करणे NIA केवळ स्फोट करणाऱ्यालाच नाही, तर संपूर्ण 'स्लीपर सेल' नेटवर्क (स्थानिक मदतनीस, अड्डे) उद्ध्वस्त करते.
'सोर्स' पर्यंत तपास केला जातो, स्फोटात वापरलेले स्फोटक (RDX, जिलेटिन इ.) नेमके कुठून आले, याचा 'सोर्स' शोधून काढला जातो. 'पंटर' ते 'मास्टरमाइंड' NIA चे पहिले काम बॉम्ब ठेवणाऱ्याला शोधणे नसून, त्यामागचा 'मुख्य सूत्रधार' (मास्टरमाईंड) शोधणे हे असते.