सरकारनामा ब्यूरो
निहारिका बारिक सिंग यांची छत्तीसगड आयएएस ऑफिसर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
निहारिका सध्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान,पंचायत आणि ग्रामीण विकास विभागाच्या प्रधान सचिवपदावर कार्यरत आहेत.
मूळच्या ओडिसाच्या रहिवासी असलेल्या निहारिका यांनी समाजशास्त्रात एमए आणि एम.फिलची डिग्री मिळवली आहे.
निहारिका बारिक या 1997ला IAS अधिकारी झाल्या.
IAS झाल्यानंतर त्यांना मध्य प्रदेश केडर मिळालं. छत्तीसगड राज्याच्या निर्मितीनंतर त्यांनी छत्तीसगड केडर घेतलं.
छत्तीसगढ राज्यातील महासमुंदच्या त्या कलेक्टर होत्या. तसेच बिलासपूर विभागाच्या आयुक्त, सचिव पर्यटन आणि संस्कृती, सचिव ग्रामोद्योग, संचालक तंत्रशिक्षण, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, अशा पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला आहे.
निहारिका यांनी अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात संचालकपदाचा कार्यभार सांभाळला आहे.
भारत सरकारचे खाते आणि सार्वजनिक वितरण विभागात सहसचिव म्हणून कार्यभार पाहिला आहे.
निहारिका यांचे लग्न छत्तीसगड केडरचे IPS जयदीप सिंग यांच्याशी झाला असून ते 1997 च्या बॅचचे आयपीएस आहेत. सध्या ते भारत सरकारच्या वतीने जर्मनीमध्ये कार्यरत आहेत.