Rajanand More
भारतीय वंशाचे निकेश अरोरा हे जगातील सर्वात महागडे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ बनले आहेत. त्यांचा पगार फेसबुकचे मार्क झुकरबर्ग आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्यापेक्षा जास्त झाला आहे.
निकेश हे सध्या सायबर सुरक्षा कंपनी ऑल्टो नेटवर्क्सचे सीईओ आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलनुसार, त्यांना 2023 मध्ये जवळपास 13,01,94,22,501 रुपये वार्षिक वेतन होते.
निकेश हे मुळचे गाझियाबादचे असून एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला होता. बीएचयूमधून त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केल्या आहे. त्यानंतर 1990 मध्ये 1700 रुपये घेऊन पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला गेले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी निकेश यांना झगडावे लागले. त्यांचा नोकरीचा अर्ज तब्बल 400 कंपन्यांनी रिजेक्ट केला होता. पण त्यानंतरही त्यांनी हार मानली नाही.
1992 मध्ये निकेश यांनी फिडेलिटी इन्व्हेटमेंट कंपनीत ट्रेनी म्हणून पहिली नोकरी मिळाली. त्यानंतर काही वर्षांतच ते या कंपनीचे उपाध्यक्ष बनले.
निकेश यांनी 2004 मध्ये गूगलमध्ये नोकरी सुरू केली. जवळपास 10 वर्षे ते या कंपनीत होते. ही नोकरी सोडून त्यांनी सॉफ्टबँकमध्ये पहिल्यांदाच अध्यक्ष व सीईओ म्हणून नोकरी मिळाली.
2018 मध्ये ते ऑल्टो नेटवर्क्स कंपनीत सीईओ म्हणून आले आणि कंपनीची भरभराट सुरू झाली. कंपनीचे बाजारमूल्य 18 अब्ज डॉलरवरून तब्बल 100 अब्ज डॉलरवर पोहचले. सायबर सुरक्षेत ही कंपनी जगात अव्वल आहे.
निकेश यांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव आयेशा थापर आहे. 2014 मध्ये त्यांचा प्रेमविवाह झाला. पहिल्या पत्नी किरण यांच्यासोबत घटस्फोट झाला आहे.