Nirmala Sitharaman : निर्मला सीतारमण यांचा खास लूक! अर्थसंकल्पाच्या दिवशी नेसली मधुबनी साडी; काय आहे खास कनेक्शन ?

Rashmi Mane

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा 'बजेट डे' लूक नेहमीप्रमाणेच खास आहे.

यावेळीही त्यांनी सुंदर बॉर्डर असलेली ऑफ-व्हाइट रंगाची साडी निवडली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मधुबनी चित्र असलेली पांढऱ्या रंगाची साडी नेसली आहे.

जेव्हा अर्थमंत्र्यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये क्रेडिट आउटरीच उपक्रमासाठी या संस्थेमध्ये भेट दिली तेव्हा दुलारी देवी यांनी साडी भेट दिली होती. दुलारी देवी यांना 2021 ला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मधुबनी कला आणि दुलारी देवी यांच्या कौशल्याचा सन्मान करण्यासाठी साडी नेसली.

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी, अर्थमंत्र्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. राष्ट्रपतींनी त्यांना दही आणि साखर खाऊ घातली आणि अर्थसंकल्पासाठी शुभेच्छा दिल्या.

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांचे लूक जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते.

दरवर्षी अर्थसंकल्पाच्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा एक खास लूक असतो. मागील अर्थसंकल्पात त्यांनी पांढरा, लाल, पिवळा, निळा, तपकिरी असे रंग निवडले आहेत.

Next : ब्रीफकेस, बही-खाता ते टॅबलेट; अर्थसंकल्प सादर करणं कसं बदलत गेलं? 

येथे क्लिक करा