Rashmi Mane
तामिळनाडूचे 'आयएएस' अधिकारी टीव्ही सोमनाथन हे सध्या केंद्रीय अर्थ मंत्रालयाचे सर्वात वरिष्ठ सचिव आहेत, त्यांच्याकडे वित्त सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अजय सेठ, कर्नाटक केडरमधील 1987 बॅचचे आयएएस अधिकारी, वित्त मंत्रालयातील आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव आहेत.
भारतीय महसूल सेवेतील आयकर विभागाचे अधिकारी असलेले नितीन गुप्ता हे सध्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ किंवा CBDT चे अध्यक्ष आहेत.
राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी संजय मल्होत्रा हे महसूल विभागात सचिव आहेत. कर संकलनाचे व्यवस्थापन आणि कर धोरणातील बदलांबाबत सल्ला देण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती.
तुहिन कांता पांडे, 1987 च्या ओडिशा केडरचे IAS अधिकारी असून गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन (DIPAM) विभागाचे सचिव आहेत.
व्ही अनंत नागेश्वरन हे भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. अर्थव्यवस्थेच्या मुद्द्यांवर ते सीतारामन यांच्या जवळच्या सल्लागारांपैकी एक आहेत. यापूर्वी, डॉ. नागेश्वरन यांनी लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून काम केले आहे.
हरियाणा केडरचे 1989 बॅचचे IAS अधिकारी विवेक जोशी 2022 मध्ये आर्थिक सेवा विभागाचे सचिव म्हणून रुजू झाले. आशीष वच्छानी
आशीष वच्छानी, तामिळनाडू केडरमधील 1997 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. सध्या केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या बजेट विभागात अतिरिक्त सचिव म्हणून काम करतात.
संजय कुमार अग्रवाल हे भारतीय महसूल सेवेतील जीएसटी आणि सीमाशुल्क विभागाचे अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाचे अध्यक्ष आहेत.