Nitasha Kaul: कोण आहेत निताशा कौल? भारतात उतरताच एअरपोर्टवरून 'रिटर्न' पाठवलं!

Rashmi Mane

निताशा कौल

भारतीय वंशाच्या प्राध्यापिका निताशा कौल यांना भारतात प्रवेश मिळालेला नाही, त्यामुळे त्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

Nitasha Kaul | Sarkarnama

लंडनला परत पाठवण्यात आले

त्यांनी स्वतः हा दावा केला आहे, की बंगळुरू विमानतळावरून त्यांना लंडनला परत पाठवण्यात आले आहे.

Nitasha Kaul | Sarkarnama

कारणही सांगितलं नाही

त्यांना अधिकाऱ्यांनी कारणही सांगितले नाही. त्यांच्यासोबत असे होईल, त्याबाबत यापूर्वी कोणतीही माहिती दिली नाही.

Nitasha Kaul | Sarkarnama

निताशा कौलचा जन्म

निताशा कौलचा जन्म उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे झाला. गोरखपूरमध्ये जन्मलेल्या निताशाचे कुटुंब मूळचे श्रीनगर, जम्मू आणि काश्मीरच्या मध्यवर्ती भागातील आहे.

Nitasha Kaul | Sarkarnama

शिक्षण

निताशा कौलने दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून बीए केले आहे. यानंतर त्यांनी 2003 मध्ये यूकेच्या हल युनिव्हर्सिटीमधून अर्थशास्त्रात मास्टर आणि अर्थशास्त्र तसेच तत्त्वज्ञानात पीएच.डी. केली.

Nitasha Kaul | Sarkarnama

महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य

निताशा कौल या नेहमीच त्यांची मतं मांडत असतात. याशिवाय काश्मीरच्या मुद्द्यावरही त्या वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलतात.

Nitasha Kaul | Sarkarnama

अफेअर्ससमोर साक्ष

2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीरमधील मानवी हक्कांच्या उल्लंघनाबाबत त्यांनी युनायटेड स्टेट्स हाऊस कमिटी ऑन फॉरेन अफेअर्ससमोर साक्षही दिली.

Nitasha Kaul | Sarkarnama

सोशल मीडियावर पोस्ट

निताशा कौलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, 'मला फक्त एवढेच सांगण्यात आले की आम्ही काहीही करू शकत नाही,'दिल्लीहून ऑर्डर आहे.'

Nitasha Kaul | Sarkarnama

दिल्लीवरून कारवाई

माझ्याकडे कर्नाटक सरकारचे अधिकृत पत्रही होते, पण मला बंगळुरू विमानतळावर जाण्याची परवानगी नव्हती.

R

Nitasha Kaul | Sarkarnama

Next : कृतिका मिश्रांनी सांगितले 90 दिवसांत कशी करावी UPSCची तयारी 

येथे क्लिक करा