Deepak Kulkarni
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं तिकीट नाकारल्यानंतर नितेश कराळे मास्तर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.
ऐननिवडणुकीच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने कराळे मास्तर यांची 6 वर्षांसाठी हकालपट्टी केली आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नितेश कराळे गुरुजी यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली असून त्यांनी आपला एकतर्फी दुसऱ्याच फेरीत आपला विजय होईल असा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानेही नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
नितेश कराळे यांनी गेल्या काही दिवसांपासून निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली होती. त्यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नितेश कराळे मास्तर नागपूर पदवीधर मतदारसंघाची दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे.
अपक्ष उमेदवारी दाखल करत त्यांनी 2020 मध्ये त्यांनी या मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्या निवडणुकीत त्यांना 6 हजार 889 मते मिळवली होती.
नितेश कराळे हे वर्धा तालुक्याच्या मांडवा येथील एका शेतकरी कुटुंबातून पुढे आलेले आहेत. त्यांनी बीएससी बीएड शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यांनी थेट स्पर्धा परीक्षांमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांना काही अपेक्षित यश मिळालं नाही.
अपयशाने खचून न जाता त्यांनी पुणेरी पॅटर्न नावानं मार्गदर्शन करणारे क्लासेस सुरू केले.वऱ्हाडी बोलीभाषेवर चांगली पकड, कठीण गोष्ट सोप्या पद्धतीनं सांगणं विद्यार्थ्यांना आवडलं. त्यांचा खद् खद् हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.