प्रसन्न जकाते
नरेंद्र मोदींवर तीव्र टीका करणारे वऱ्हाडी बोलीफेम नीतेश कराळे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची कराळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मदत घेतली.
कराळे मातोश्रीला पोहोचल्यावर त्यांना सुमारे दोन तास ताटकळत ठेवण्यात आले. कुणीही त्यांना काहीही सांगायला तयार नव्हते.
सुरक्षेच्या कारणांमुळे पोलिसांनीही कराळे यांना जाऊ दिले नाही. मातोश्रीतून ठाकरे यांचे खासगी सचिन म्हात्रे प्रतिसाद देत नव्हते.
कराळे उन्हात ताटकळत असल्याचे कळल्यानंतर दानवे यांच्या सहाय्यकांसह अनेकांनी म्हात्रे यांना फोन केला. परंतु बराच वेळ म्हात्रे यांनी कराळेंना बोलावले नाही.
बरीच खटपट केल्यानंतर अखेर म्हात्रे बाहेर आलेत. येताच त्यांनी कराळे यांच्यावर ताव काढला. ‘तुला मी बोलावले का?’ असे म्हणत ते कराळेंवर चिडले.
मातोश्रीवरून नेहमीच अपमानास्पद वागणूक मिळते म्हणून एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक खासदार, आमदार बाहेर पडले. ते नेमके कोणत्या कारणामुळे याचा प्रत्यय आल्याचा संताप नीतेश कराळे यांनी व्यक्त केला.
मातोश्री, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याकडून मिळालेल्या वागणुकीचे अनेक किस्से अद्यापही एकनाथ शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेले खासदार, आमदार सांगतात.