Roshan More
पाचवी, आठवी किंवा दहावीनंतर शाळा बदलण्याचे झंझट आता संपणार. नीती आयोगाने शालेय शिक्षणात ऐतिहासिक बदल घडवून आणणारा नवा फॉर्म्युला आणलाय.
पहिलीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी थेट बारावी होऊनच बाहेर पडणार! प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षण एकाच शाळेत मिळणार.
लांबच्या शाळांमुळे होणारी शिक्षणातील गळती (ड्रॉपआऊट) आता थांबणार. विशेषतः ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला यामुळे मोठा आधार मिळणार.
नव्या शाळा उभारण्याऐवजी जवळ असलेल्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांचे एकत्रिकरण करून एकच भव्य 'समग्र शैक्षणिक संकुल' बनवले जाईल.
एकाच संकुलात सर्व विषयांचे तज्ज्ञ शिक्षक उपलब्ध असतील. त्यामुळे केवळ एका शिक्षकावर चालणाऱ्या शाळांचा प्रश्न पूर्णपणे सुटेल.
मोठ्या संकुलांमुळे अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, संगणक कक्ष, भव्य ग्रंथालय, क्रीडांगण आणि कौशल्य विकासाच्या सोयी एकाच ठिकाणी मिळतील.
माध्यमिक शाळेसाठी दुसऱ्या गावात जाणे, वाहतुकीची सोय नसणे आणि येणारा आर्थिक खर्च या सर्व समस्यांवर हा एकच मास्टरस्ट्रोक ठरेल.