Pradeep Pendhare
मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाचा अभ्यासाचा अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे सुपूर्द
मुंबईचे देशांतर्गत उत्पादन 2023 पर्यंत 26 लाख कोटी करण्याचे उद्दिष्ट निती आयोगाने अहवाल ठेवले आहे.
मुंबईत सध्या सुमारे 1कोटी रोजगार असून, सुमारे 30 लाख रोजगार अजून निर्मितीवर प्रयत्न करण्याचे निती आयोगाचा अहवालातून सुचविले आहे.
मुंबईला ग्लोबल सर्व्हिसेस हब करणे, परवडणारी घरे देणे, एमएमआरला जागतिक पर्यटन बनवणं, बंदरांचा एकात्मिक विकास, सुनियोजित शहरांचा विकास, सर्वसमावेशकता आणि शाश्वतता, जागतिक सुविधा.
केंद्र सरकारच्या जमिनीवरील 22 लाख झोपडपट्टीवासियांचे पुर्वसनासाठी सुमारे 20 हजार कोटींचा गृहनिर्माण निधी उभारण्याची निती आयोगाची सूचना
मुंबईतील 300 किलोमीटर सागरी किनारपट्टीलगत असलेल्या सहा ठिकाणी पर्यटन केंद्र विकसित करण्याबरोबर दोन ठिकाणी जलक्रीडा केंद्र उभारण्यात येणार
खासगी विकासकांच्या सहभागातून नवी मुंबईतील अेरोसीटीत 20 लाख चौरस फूटाचे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र विकसित करण्यात येणार
अटलसेतूला लागून 500 एकर जागेवर थिम पार्क, तर मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जागेवर कार्यक्रम केंद्र उभारण्यात येणार आहे.