सरकारनामा ब्यूरो
स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच तळागाळातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी NITI आयोगाने 'वोकल फॉर लोकल' मोहीम सुरू केली आहे.
‘वोकल फॉर लोकल’ उपक्रमांतर्गत स्वावलंबन आणि शाश्वत विकासाला चालना मिळेल.
या उपक्रमांतर्गत ‘आकांक्षा’ या लोगोचे अनावरण करण्यात आले. या ब्रँड-अंतर्गत स्वदेशी स्थानिक उत्पादने एकत्रित करणे आहे.
स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी 'आकांक्षा ब्रँड'द्वारे 'इंटरनेटवर GeM' नावाचे 'पोर्टल' तयार करण्यात आले आहे.
पुरेसे स्थानिक व्यवसाय निर्माण करणे, आर्थिक सक्षमीकरण आणि स्वयंपूर्णता वाढवणे हा उपक्रमाचा उद्देश आहे.
देशांतर्गत उद्योगांना बळकट करण्यासाठी स्थानिक पातळीवरील वस्तूंना प्राधान्य देणे, तसेच नागरिकांना त्याचा वापर करण्याचे आवाहन करणे.
स्थानिक उत्पादक आणि कारागीरांच्या उन्नतीसाठी समर्पित असलेल्या या उपक्रमात आदिवासी कला आणि कौशल्यांना समर्थन केले आहे.
देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी वोकल फॉर लोकल उपक्रम सुरू करण्यात आला.