सरकारनामा ब्यूरो
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अस्सल खवय्ये आहेत. फास्टफूडवर त्यांचे विशेष प्रेम आहे.
नितीन गडकरी सांगतात की त्यांना भारतीय शाकाहारी जेवण खूप आवडते.
त्यांनी एका मुलखतीत सांगितले की, इतर कोणत्याही शहरापेक्षा मला मुंबईचे जेवण प्रचंड आवडते. रात्रीच्या 12 नंतर मुंबईसारखे दुसरे कुठेच तुम्हाला कमी पैशात जेवण मिळणार नाही.
गडकरी यांना चायनीज जेवण आवडते. त्याचबरोबर मुंबई, पुणे आणि नागपूरचे स्ट्रीटफूड आवडते. त्यामुळे त्यांना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी ते या पदार्थांचा आस्वाद घेतात.
त्यांच्या घरात जेवण करण्यासाठी संपूर्ण टीम असून ती दररोज कोणते पदार्थ बनवायचे यावर चर्चा करते. मग तो पदार्थ बनवला जातो. असे त्यांनी सांगितले.
त्यांनी सांगितले की, मला घरच्या जेवणात चपाती, वरण-भात, पुरण पोळी, सूप, सॅलड, बर्फी हे पदार्थ खूप आवडतात.
महाराष्ट्रीयन शाकाहारी जेवणाबरोबरच त्यांना वडापाव, समोसा, पावभाजी, पुलाव,सॅन्डविच असे स्ट्रीटफूडही प्रचंड आवडतात.
मुंबईचा वडापाव आणि भेळ त्यांचा फेव्हरेट असून ते रात्रीच्या वेळी मुंबईच्या फुटपाथवरुन जाताना छोट्या गाड्यांवरील भेळ खातात.