BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत मुस्लिम चेहरा; नितीन नवीन यांच्या टीममधील 'या' चेहऱ्याची तुफान चर्चा!

Aslam Shanedivan

भारतीय जनता पार्टी

नुकताच भारतीय जनता पार्टीच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.

BJP National Working Committee | Sarkarnama

निवडणूका

उत्तर प्रदेश पंजाब, उत्तराखंड आणि इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि 2029 ची लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे बदल करण्यात आले आहेत.

BJP National Working Committee | Sarkarnama

नितीन नवीन

काही दिवसांपूर्वी भाजपनं राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नवीन यांची निवड केली होती. यानंतर आता त्यांच्या नेतृत्त्वात काम करणाऱ्या नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

BJP National Working Committee | Sarkarnama

कार्यकारिणी

भाजपने जाहीर कलेल्या कार्यकारिणीत 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि 8 राष्ट्रीय सरचिटणीसांची घोषणा करण्यात आली आहे.

BJP National Working Committee | Sarkarnama

तारिक मन्सूर

विशेष बाब म्हणजे जाहीर झालेल्या या कार्यकारिणीत भाजपनं एका मुस्लीम नेत्याला स्थान दिलं आहे. त्यांचे नाव तारिक मन्सूर असं आहे.

BJP National Working Committee | Sarkarnama

उत्तर प्रदेश

राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उत्तर प्रदेशातील तारिक मन्सूर यांना संधी मिळाली आहे.

BJP National Working Committee | Sarkarnama

अलीगड मुस्लिम विद्यापीठ

तारिक मन्सूर उत्तर प्रदेश विधानपरिषदेचे आमदार असून ते ओबीसी प्रवर्गातून येतात. तसेच ते अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे कुलगुरु देखील होते.

BJP National Working Committee | Sarkarnama

प्राचार्य

याशिवाय त्यांनी जवाहरलाल नेहरु मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे प्राचार्य म्हणून काम केलं आहे.

BJP National Working Committee | Sarkarnama

भाजपचा प्रयत्न

तारिक मन्सूर यांना संधी देण्या मागे ओबीसी मुस्लिम समुदायाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजपचा आहे

BJP National Working Committee | Sarkarnama

कुंवर बासित अली

तारिक मन्सूर यांच्याशिवाय कुंवर बासित अली यांना देखील मोठी जबाबदारी देण्यात आली असून त्यांना भाजपच्या अल्पसंख्यांक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष करण्यात आलं आहे.

BJP National Working Committee | Sarkarnama

Next : लोकसेभतील पराभवानंतर राष्ट्रीय राजकारणात पुन्हा संधी : कोण आहेत भारती पवार?

आणखी पाहा