Jagdish Patil
बिहार विधानसभेत भाजपप्रणित NDA ला पूर्ण बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आता एनडीएकडून सरकार बनवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
तर आता पुन्हा एकदा नितीश कुमारच बिहारच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याची शक्यता आहे.
याच पार्श्वभूमीवर नितीश यांचा आतापर्यंतचा CM पदाचा कार्यकाळ आणि देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवणारे नेते कोण? ते जाणून घेऊया.
नितीश यांनी आतापर्यंत 9 वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र, तरीही सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा मान त्यांना नाही.
सिक्कीमचे माजी मुख्यमंत्री पवन कुमार चामलिंग यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषवलंय. ते सलग 5 टर्म CM होते. त्यांचा एकूण कार्यकाळ 24 वर्षे 165 दिवसांचा होता.
त्यानंतर ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक हे दुसऱ्या क्रमांकावर असून त्यांचा कार्यकाळ 24 वर्ष 99 दिवसांचा होता.
तर ज्योति बसु हे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदी 23 वर्ष 137 दिवस विराजमान होते.
गेगोंग अपांग अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी 22 वर्ष 250 दिवस तर लाल थनहवला हे मिझोरामच्या मुख्यमंत्रिपदी 22 वर्ष 60 दिवस विराजमान होते.
वीरभद्र सिंह यांनी हिमाचल प्रदेशचे प्रतिनिधित्व 21 वर्ष 13 दिवस केले तर माणिक सरकार यांनी त्रिपुराचे 19 वर्ष 363 दिवस प्रतिनिधित्व केले.
तमिळनाडूत एम. करुणानिधी यांचा कार्यकाळ 18 वर्ष 362 दिवस आणि पंजाबमध्ये प्रकाश सिंह बादल यांचा 18 वर्ष, 350 दिवसांचा कार्यकाळ राहिला आहे.
नीतीश कुमार हे 9 वेळा मुख्यमंत्री झालेत. त्यांचा कार्यकाळ 18 वर्ष 347 दिवसांचा आहे. ते पु्न्हा CM झाल्यास ते देशातील सर्वाधिक 10 वेळा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे नेते ठरतील.