Jagdish Patil
नितीश कुमार यांनी दहाव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर त्यांच्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊया.
नितीश कुमार यांचा जन्म 1 मार्च 1951 रोजी पटना येथील बख्तियारपूरमधील एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला.
वृत्तानुसार, त्यांचे वडील कविराज राम लखन हे स्वातंत्र्यसैनिक आणि आयुर्वेदिक वैद्य होते तर त्यांची आई परमेश्वरी देवी गृहिणी होती.
त्यांचं सुरुवातीचे शिक्षण बख्तियारपूर येथे झाले. त्यानंतर पाटण्यातील विज्ञान महाविद्यालयातून त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केलं. ते अभ्यासात हुषार होते.
1972 मध्ये, त्यांनी बिहार अभियांत्रिकी महाविद्यालयातून (NIT) मेकॅनिकल इंजीनिअरिंगची पदवी मिळवली.
इंजीनिअरिंगनंतर त्यांनी काही काळ नोकरी केली. त्यांनी BSEB (बिहार राज्य विद्युत मंडळ) मध्ये इंजिनिअर म्हणून नोकरी केली.
जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, व्ही.पी. सिंह यांसारख्या महान नेत्यांच्या सहवासात नितीश कुमारांनी राजकारणाचे धडे घेतले.
1985 साली त्यांनी पहिल्यांदा हरनौत येथून बिहार विधानसभेची निवडणूक जिंकली. 1989 मध्ये लोकसभेवर गेले. 1990 मध्ये कृषी राज्यमंत्री आणि 1998 मध्ये केंद्रीय रेल्वे मंत्री बनले.
ते 2000 साली पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री झाले, परंतु विधानसभेत बहुमत सिद्ध न केल्याने त्यांना अवघ्या सात दिवसांत राजीनामा द्यावा लागला.
जितनराम मांझी यांचा कार्यकाळ बाजूला ठेवला तर नितीश कुमार 2005 पासून आतापर्यंत सतत बिहार राज्याचे मुख्यमंत्री आहेत.