Jagdish Patil
कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपने स्वबळाचा नारा दिल्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे.
अशातच आता भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार श्रद्धा भोसले मराठी बोलण्यावरून प्रचंड ट्रोल झाल्या आहेत.
नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज 'दाखल केला ऐवजी अर्ज घातला' असं म्हणल्यामुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
तर नेटकऱ्यांनी मराठी बोलण्यावरून ट्रोल केलेल्या श्रद्धा सावंत भोसले नेमक्या कोण आहेत ते जाणून घेऊया.
श्रद्धा भोसले सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्यातील असून त्यांनी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे.
अर्ज दाखल केल्यानंतर मराठी बोलताना अडखळल्याचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि त्या चर्चेत आल्या.
श्रद्धा भोसले या सावंतवाडी संस्थानचे शेवटचे राजे व माजी आमदार दिवंगत श्रीमंत शिवरामराजे भोसले यांच्या नातसून आहेत.
श्रद्धा यांचे पती लखमराजे भोसले हे भाजप युवा मोर्चाचे विद्यमान प्रदेश उपाध्यक्ष आहेत. या दोघांचा विवाह 2019 साली झाला.
सावंतवाडी संस्थानचा वारसा आणि राजघराण्याची परंपरा लक्षात घेत भाजपने त्यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे.
श्रद्धा यांचा जन्म मुंबई झाला असून त्यांचं शिक्षण अमेरिका, लंडनमध्ये झालं आहे. त्या मूळच्या गुजरातच्या आहेत.