Rashmi Mane
अपयश हीच यशाची पहिली पायरी असते” हे वाक्य खऱ्या अर्थाने साकारलं – निवृत्ती सोमनाथ आव्हाड यांनी!
नाशिक जिल्ह्यातील गुळवंच गावातील शेतकरी कुटुंबात जन्म. शिक्षणाविषयी प्रचंड जिद्द आणि मेहनतीची तयारी!
सातवीपर्यंत मामाच्या गावी, नंतर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंत शिक्षण, बारावी सिन्नर येथून – विज्ञान शाखा.
पुण्याच्या सिंहगड इन्स्टिट्यूटमधून इंजिनियरिंग पूर्ण केलं. त्यानंतर तीन वर्षं खाजगी नोकरी केली.
नोकरी करत असतानाच घेतला यूपीएससीचा निर्धार. सुरुवात एमपीएससीत अधिकारी म्हणून यश.
यूपीएससी परीक्षेत सलग तीन वेळा अपयश. तरीही जिद्द कायम ठेवली. आत्मविश्वास ढळू दिला नाही.
2016 मध्ये युपीएससी क्लिअर केली – महसूल विभागात आयआरएस अधिकारी म्हणून नियुक्ती. पण ध्येय होतं आयएएस!
सलग प्रयत्न, कठोर अभ्यास आणि आत्मविश्वासामुळे पाचव्या प्रयत्नात अखेर आयएएस अधिकारी बनले.