डॉक्टरांच्या मनमानीला चाप! रुग्णांना आकर्षित करण्यासाठी खोट्या जाहिराती अन् मोठे दावे करणं अंगलट येणार

Jagdish Patil

आश्वासने

रुग्णांना वैद्यकीय उपचारांबाबत मोठी आश्वासने देणे, स्वतःला 'सर्वोत्तम' म्हणून जाहिरात करणं, डॉक्टरांना महागात पडणार आहे.

NMC Doctor Guidelines | Sarkarnama

NMC

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने (NMC) वैद्यकीय संस्था, नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकांसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

NMC Doctor Guidelines | Sarkarnama

दावे

या नियमांनुसार, डॉक्टरांना 'सर्वोत्तम' 'नंबर वन' 'हमखास रोगमुक्ती यांसारखे अवास्तव असे पडताळणी न करता येणारे दावे करता येणार नाहीत.

NMC Doctor Guidelines | Sarkarnama

दिशाभूल

वैद्यकीय व्यवसायाचे व्यावसायिकीकरण रोखणे, रुग्णांची दिशाभूल करणाऱ्या दाव्यांना आळा घालणे हा या नियमांचा उद्देश आहे.

NMC Doctor Guidelines | Sarkarnama

भीती

उपचारांची भीती दाखवून रुग्णांना अनावश्यक तपासण्या किंवा शस्त्रक्रियांची मागणी निर्माण करणे.

NMC Doctor Guidelines | Sarkarnama

फोटो

तसंच औषधे, वैद्यकीय उपकरणांच्या जाहिरातींसाठी स्वतःच्या नावाचा, फोटोचा वापर करून शिफारस करण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

NMC Doctor Guidelines | Sarkarnama

बंदी

रुग्णांचे अनुभव, उपचारांपूर्वीचे आणि उपचारांनंतरचे फोटो, सेलिब्रिटी रुग्णांचा वापर करून वैद्यकीय सेवेचा प्रचारावरही बंदी घातली आहे.

NMC Doctor Guidelines | Sarkarnama

रिव्ह्यू

पैसे देऊन मिळवलेली रेटिंग, रिव्ह्यू, फॉलोअर्स आणि लाइक्सच्या माध्यमातून स्वतःची प्रतिमा उंचावण्यावरही बंदी असेल.

NMC Doctor Guidelines | Sarkarnama

कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टरांविरोधात संबंधित राज्य वैद्यकीय परिषदेकडून कारवाई केली जाऊ शकते.

NMC Doctor Guidelines | Sarkarnama

इशारा

पहिल्या उल्लंघनासाठी इशारा आणि नीतिमत्तेचे प्रशिक्षण तर गंभीर प्रकरणांत 6 ते 12 महिने नोंदणी निलंबित करण्याची शिफारस आहे.

NMC Doctor Guidelines

नोटीस

मात्र, कारवाईपूर्वी डॉक्टरांना कारणे दाखवा नोटीस देऊन बाजू मांडण्याची संधीही मिळणार आहे.

NMC Doctor Guidelines

NEXT : यूट्युबर ध्रुव राठींची महिन्याला कमाई किती? एकूण संपत्तीचा आकडा पाहून व्हाल थक्क

Dhruv Rathee | Sarkarnama
क्लिक करा