Roshan More
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात विरोध पक्षांनी अविश्वासाचा ठराव मांडला आहे.
या ठरावावर आज मतदान होणार आहे. त्यासाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी आपल्या सदस्यांना व्हिप जारी केला आहे. तर, भाजपने देखील आपल्या सदस्यांसाठी व्हिप बजावला आहे.
ओम बिर्ला हे सरकारी पक्षाला मदत करत असून विरोधकांसोबत पक्षपातीपणाने वागत असल्याचा आरोप करत करण्यात येत आहे.
अविश्वास ठरवावर मतदान घेण्याआधी 50 सदस्यांनी उभे राहून त्याला पाठींबा देणे गरजेचे आहे. जर 50 सदस्यांचा पाठींबा नसेल तर मतदानाआधीच हा प्रस्ताव खारीज केला जातो.
बहुमताच्या आधारे हा प्रस्ताव पास होऊ शकतो. लोकसभेतील सदस्यसंख्या पाहात अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी विरोधकांच्या बाजुने 271 सदस्यांनी मतदान करणे गरजेचे आहे.
आज लोकसभेचे कामकाज सुरू करताना तालिका अध्यक्ष एन. के. प्रेमचंद्रन हे अध्यक्षांच्या आसनावर बसले होते.अविश्वास ठरवाच्या वेळी ओम बिर्ला हे लोकसभेच्या अध्यक्षपदावरून कामकाज पाहणार नाहीत.