राष्ट्रपतींच्या दौऱ्याचा प्रोटोकॉल काय असतो? जाणून घ्या एका क्लिकवर...

सरकारनामा ब्यूरो

प्रोटोकॉलचे उल्लंघन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग जिल्ह्यातील दौऱ्यादरम्यान प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

President of India Protocol Rules | Sarkarnama

प्रथम नागरिक

राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. त्यामुळे त्यांच्या दौ-यासाठी सुरक्षेच्यादृष्टीने विशेष प्रोटोकॉलचे पालन होणे अनिवार्यच असते. काय असतो हा विशेष प्रोटोकॉल, जाणून घेऊयात.

President of India Protocol Rules | Sarkarnama

सर्वोच्च घटनात्मक पद

भारताच्या राष्ट्रपतींचा प्रोटोकॉल देशातील सर्वोच्च घटनात्मक पद असल्याने अत्यंत कडक असतो. यात सुरक्षेसाठी 'ब्लू बुक'चे पालन, विमानतळावर राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना राष्ट्रपतींचे स्वागत करावे लागते

President of India Protocol Rules | Sarkarnama

ब्लू बुक

सुरक्षा (ब्लू बुक): राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी 'ब्लू बुक' या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोर पालन केले जाते, म्हणजे ज्यात गुप्तचर संस्थांचा समन्वय असतो, दौऱ्यावर असताना राज्यपाल, मुख्यमंत्री, आणि वरिष्ठ अधिकारी राष्ट्रपतींचे स्वागत करतात.

President of India Protocol Rules | Sarkarnama

वेळापत्रक

राष्ट्रपतींच्या दौऱ्याचे पूर्वनियोजित वेळापत्रक असते. त्यानुसारच ते कोणत्याही शहर किंवा ठिकाणा दौरा करतात. ऐनवेळी नियोजन बदलात येत नाही. कार्यक्रमातील सहभागी लोकांची, व्यासपीठावरील माननीयांची संख्या निश्चित असते.

President of India Protocol Rules | Sarkarnama

सैन्य प्रमुख

पूर्वनियोजित यादीतील अधिकृत अतिथीच राष्ट्रपतींच्या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात, राष्ट्रपती हे तिन्ही दलांचे सरसेनापती असल्याने त्यांच्या दौऱ्यात लष्करी प्रोटोकॉलचे पालन होते.

President of India Protocol Rules | Sarkarnama

प्रतिनिधी

प्रोटोकॉलनुसार राज्यात त्यांच्या स्वागतासाठी मुख्यमंत्री उपस्थित असणे अपेक्षित असते. अत्यावश्यक कारण असल्यास मुख्यमंत्री आपल्या जागी वरिष्ठ कॅबिनेट मंत्र्याला प्रतिनिधी म्हणून पाठवू शकतात.

President of India Protocol Rules | Sarkarnama

अधिकारी उपस्थिती

राज्याचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक स्वागत आणि समन्वयासाठी उपस्थित असतात. स्थानिक महापौर,जिल्हा प्रशासन आणि लष्करी अधिकारी देखील स्वागतावेळी उपस्थित असतात.

President of India Protocol Rules | Sarkarnama

राज्य सरकार

राष्ट्रपतींना हात मिळवणे किंवा पाय स्पर्श करणे प्रोटोकॉलविरोधी आहे. हात जोडून, थोडे झुकून अभिवादन केले जाते. राष्ट्रपतींच्या दौऱ्यात सुरक्षा आणि निवासाची पूर्ण जबाबदारी त्या त्या राज्य सरकारची असते.

President of India Protocol Rules | Sarkarnama

NEXT : शरद पवारांची ‘गोल्डन पॉलिटिकल जर्नी’! कारकीर्द आता 'साठी'कडे, 50 वर्षे लोकप्रतिनिधीत्व करणारे दिग्गज नेते एका क्लिकवर...

Sharad Pawar | Sarkarnama
येथे क्लिक करा.