सरकारनामा ब्यूरो
आता आधार कार्ड खिशात घेऊन फिरायची आवश्यकता लागणार नाही, कारण भारत सरकारने आधार मोबाईल अॅप लाँच केलं आहे.
डिजिटल सोयीसाठी आणि गोपनीयतेसाठी मोठा पाऊल टाकत, हे आधार मोबाईल अॅप लाँच करण्यात आले आहे.
"फेस आयडी ऑथेंटिकेशन" हे अॅपचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यामुळे आधार वापरकर्त्यांना अधिक सुरक्षा आणि सोयी मिळणार आहेत.
"QR कोड स्कॅन करून, जसे युपीआय पेमेंट होते अगदी तसेच आधार व्हेरिफिकेशन होईल." असे केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
आधार अॅपमध्ये सध्या बीटा टेस्टिंग व्हर्जनमध्ये असून त्यामध्ये गोपनीयतेची काळजी घेतली जाणार आहे.
केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नवीन अॅपच्या सुविधेबद्दल त्यांच्या X या प्लॅटफाॅरुन माहिती दिली