Deepak Kulkarni
राज्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया आत्तापर्यंत दरवर्षी मे-जून महिन्यामध्ये पूर्ण केली जात असत.
परंतू एकीकडे पुढील आठवड्यापासून शाळा सुरू होत असताना झेडपी शाळांच्या एकाही शिक्षकांची बदली करण्यात आलेली नाही.
राज्यातील बदली पात्र शिक्षकांकडून मे-जून महिन्यांतील अपेक्षित बदलीच्या आदेशानुसार आपल्या कुटुंबाच्या राहण्याची तसेच पाल्यांच्या शाळा,नोकरी यांसह विविध प्रकारच्या व्यवस्था करण्यात येतात.
पण आता जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रिया थांबवण्यात आल्यामुळे किंवा जूननंतर बदल्या करण्यात आल्यामुळे अनेक त्रासांना सामोरं जावं लागण्याची शक्यता असते.
राज्यात जनगणना तसेच मतदारयाद्यांच्या विशेष पडताळणी मोहीम (एसआरआय) या कामांची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.
सरकारकडून या दोन्ही महत्त्वाच्या सरकारी कामांसाठी कर्मचारी उपलब्ध व्हावेत,म्हणून यंदा जिल्हा परिषद शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या रोखल्या आहेत.
याविषयीचे पत्र ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठवले आहे.
शिक्षण विभागाच्या नवीन माहितीनुसार, झेडपीच्या बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या पुढच्या वर्षी करण्यात येणार आहे.
राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडून बदली आदेशासाठी विनंती बदली, पती-पत्नी एकत्रीकरण, दिव्यांग आणि इतर सर्व प्रकारच्या बदल्यांचाही समावेश केला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.