Mangesh Mahale
नरेंद्र मोदी हे आज जवाहरलाल नेहरूंचा ४,३९७ दिवसांचा विक्रम मागे टाकत सर्वाधिक काळ सलग निवडून आलेले पंतप्रधान ठरले आहेत.
स्वतंत्र भारतातील पहिले निवडून आलेले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १३ मे १९५२ रोजी पदाची शपथ घेतली होती. त्यांनी सलग ४,३९७ दिवस देशाचे नेतृत्व केले.
नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली होती. ९ जून २०२६ रोजी त्यांचा कार्यकाळ ४,३९८ दिवसांचा झाला त्यांनी नेहरूंचा विक्रम मोडला.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून अनेक महत्त्वाचे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. सर्वाधिक काळ पंतप्रधान राहणारे पहिले बिगर-काँग्रेसी नेते म्हणून ते आधीच इतिहासात नोंदले गेले आहेत.
मोदींनी अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळही मागे टाकला आहे. सलग तीन लोकसभा निवडणुका जिंकून केंद्रात सरकार स्थापन करणारे ते पहिले बिगर-काँग्रेसी नेते ठरले आहेत.
मोदी यांचा प्रशासकीय प्रवास ७ ऑक्टोबर २००१ रोजी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून सुरू झाला. २२ मे २०१४ पर्यंत त्यांनी गुजरातचे नेतृत्व केले २६ मे २०१४ पासून ते देशाचे पंतप्रधान आहेत.
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान या दोन्ही पदांवरील कार्यकाळ एकत्रित विचारात घेतल्यास त्यांनी निवडून आलेल्या सरकारचे प्रमुख म्हणून नऊ हजार दिवसांहून अधिक काळ पूर्ण केला आहे
भारतीय राजकारणातील सर्वाधिक दीर्घकाळ प्रभावी नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचे स्थान अधिक भक्कम झाले आहे.