Vijay Sankalp Rally : शक्तिप्रदर्शनाने सातपुते, निंबाळकरांचे अर्ज दाखल

Vijaykumar Dudhale

विजय संकल्प रॅली

महायुतीचे माढ्याचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, तर सोलापूरचे राम सातपुते यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात आले होते. अर्ज दाखल केल्यानंतर शहरातून विजय संकल्प रॅली काढण्यात आली.

Viajy sankalp Rally | Sarkarnama

रणजितसिंह नाईक निंबाळकर

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी माढा मतदारसंघासाठी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना त्यांच्यासमवेत आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, शहाजी पाटील आणि जयकुमार गोरे होते.

Ranjitshinh Naik Nimbalkar | Sarkarnama

राम सातपुते

राम सातपुते यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्या वेळी त्यांच्यासोबत आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार राजन पाटील व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते. सातपुते यांना त्यांच्या पत्नीने पूरक अर्ज भरला.

Ram Satpute | Sarkarnama

मतदारांना अभिवादन

विजय संकल्प रॅलीत माजी सहकारमंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख हे सहभागी झाले होते. देशमुख यांच्यासमवेत मतदारांना उमेदवार राम सातपुते यांनी अभिवादन केले.

Viajy sankalp Rally | Sarkarnama

सचिन कल्याणशेट्टी

विजय संकल्प रॅली अक्कलकोटचे आमदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी सहभागी झाले होते. उन्हाचा तडाखा वाढल्याने त्यांनी डोक्याला गमछा गुंडाळला होता.

MLA Sachin Kalyanshetti | Sarkarnama

विजय संकल्प रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

महायुतीच्या विजय संकल्प रॅलीला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. गर्दीमुळे आणि पोलिसांच्या नियोजनअभावी संभाजी चौकापासून पार्क चौकापर्यंत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती

Viajy sankalp Rally | Sarkarnama

बाळराजे पाटील

विजय संकल्प रॅलीत मोहोळचे युवा नेतृत्व बाळराजे पाटील हे पायी सहभागी झाले होते.

Viajy sankalp Rally | Sarkarnama

मुस्लिम बांधवही सहभागी

रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राम सातपुते यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना काढण्यात आलेल्या विजय संकल्प रॅलीत मुस्लिम बांधवही सहभागी झाले होते.

R

Viajy sankalp Rally | Sarkarnama

भाजपकडून म्हैसूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची; थेट राजघराण्यातच दिली उमेदवारी!

Yaduveer Wadiyar | Sarkarnama