Rashmi Mane
भारत सरकारने मुलांच्या भविष्याचा विचार करून आणली आहे NPS वात्सल्य योजना. या योजनेत पालक आपल्या मुलांच्या नावाने गुंतवणूक करू शकतात ज्यामुळे त्यांच्या शिक्षण व भविष्यासाठी मोठा फंड तयार होऊ शकेल.
NPS वात्सल्य योजना ही 18 वर्षांखालील मुलांसाठी आहे. पालक त्यांच्यासाठी NPS अकाउंट उघडू शकतात, या योजनेत गुंतवण्यासाठी फक्त 1000 पासून सुरुवात करता येते.
या योजनेचे वैशिष्ट्ये म्हणजे 3 वर्षांनंतर पैसे काढता येतात. मात्र ही रक्कम फक्त शिक्षण किंवा उपचारासाठीच वापरता येते. तसेच ही योजना 18 वर्षांनी मॅच्युअर होते, आणि पुढेही चालू ठेवता येते.
जर तुम्ही दरवर्षी NPS वात्सल्य योजनेत 10,000 गुंतवले आणि 18 वर्षे गुंतवणूक चालू ठेवली तर एकूण गुंतवणूक 5 लाख होते. त्यावर 10% वार्षिक परताव्याने जवळजवळ 2.75 कोटींचा फंड तयार होऊ शकतो.
PPF (Public Provident Fund) ही सरकारमान्य बचत योजना आहे. सध्या यात 7.1% व्याजदर आहे. तर या योजनेत दरवर्षी 1.5 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.
जर तुम्ही 25 वर्षे PPF योजनेत दरवर्षी 1.5 लाख गुंतवले तर एकूण गुंतवणूक 37.5 लाख होईल. आणि 25 वर्षांनी फंड वाढून सुमारे 1.03 कोटी इतका होईल.
जर आपण NPS वात्सल्यमध्ये दरवर्षी 10,000 गुंतवले, तर 18 वर्षांत 5 लाखची गुंतवणूक होईल आणि 60 वर्षांपर्यंत ती वाढून 2.75 कोटींवर पोहोचेल. तर PPF मध्ये दरवर्षी ₹1.5 लाख गुंतवल्यास 25 वर्षांनंतर 1.03 कोटी फंड तयार होतो.
जर तुम्हाला मुलांच्या शिक्षण, विवाह आणि निवृत्तीपर्यंतचा आर्थिक आधार हवा असेल तर NPS वात्सल्य योजना निवडा. जर सुरक्षित, स्थिर आणि करमुक्त गुंतवणूक हवी असेल तर PPF योग्य ठरेल.