NEET Exam: 'नीट'च्या 21 जूनच्या परीक्षेसाठी 'NTA'कडून परीक्षार्थी विद्यार्थ्यांना दिलासा; 'हा' महत्त्वाचा बदल माहितीय का..?

Deepak Kulkarni

परीक्षा रद्द

3 मे रोजी झालेली नीटची परीक्षा पेपरफुटीच्या घटनांमुळे रद्द करण्यात आली होती.

NEET Exam | Sarkarnama

पुर्नपरीक्षा

यानंतर एनटीएकडून पेपरफुटीमुळे रद्द झालेली NEET ची पुर्नपरीक्षा 21 जून 2026 रोजी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं.

NEET Exam | Sarkarnama

संतापाची लाट

पेपरफुटीमुळे नीट परीक्षा रद्द झाल्यानं मोठी खळबळ उडाली होती. वर्षभर या परीक्षेची तयारी केलेल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

NEET Exam | Sarkarnama

महत्त्वाचा निर्णय

एनटीएकडून आता 21 जून रोजी होत असलेल्या नीटच्या परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

NEET Exam | Sarkarnama

15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ

परीक्षार्थी विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात येणार असल्याची माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) दिली आहे. 

NEET Exam | Sarkarnama

195 मिनिटे

नवीन बदलानुसार, आता परीक्षेचा सुधारित कालावधी हा दुपारी 2.00 ते 5.15 या असणार असून एकूण 195 मिनिटे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

NEET Exam | Sarkarnama

रफ कामासाठी पानांची संख्या...

तसेच प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला आणि शेवटी मिळून रफ कामासाठी पानांची संख्याही 2 ने वाढवली असून ती आता थेट 4 करण्यात आली आहे. 

NEET Exam | Sarkarnama

त्रास

पेपरफुटीचा विद्यार्थ्यांना जो शारीरिक-मानसिक त्रास सहन करावा लागला, त्या पार्श्वभूमीवर एनटीएनं हा निर्णय घेतला आहे.

NEET Exam | Sarkarnama

50 हून अधिक जणांना अटक

नीट पेपर फुटीप्रकरणी देशभरातून आतापर्यंत सुमारे 50 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने 12 मे रोजी तपास हाती घेतल्यानंतर दिल्ली, हरियाणा (जयपूर-गुरग्राम) आणि महाराष्ट्रातील (पुणे-नाशिक-लातूर) मुख्य सूत्रधारांसह टोळ्यांवर धडक कारवाया केल्या आहेत.

NEET Exam | Sarkarnama

NEXT: सवलतीत एसटीने प्रवास करता? ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’चा फायदा जाणून घ्या...

MSRTC-NCMC-card-2.jpg | Sarkarnama
येथे क्लिक करा...