सरकारनामा ब्यूरो
रशिया आणि युक्रेन
रशिया आणि युक्रेन या देशांचं युद्ध गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. यात आतापर्यत 12,000 हून अधिक नागरिक मारले गेले आहेत.
रशियाने शेजारी असलेल्या इतर देशांनाही आण्विक शस्त्राचा (न्युक्लिअर बॉम्ब) हल्ला करु, असा इशारा दिला आहे.
रशियासह जगात अनेक देश आहेत ज्यांच्याकडे आण्विकशस्त्राचा प्रचंड साठा आहे. कोणते आहेत ते देश पाहूयात.
अमेरिका, रशिया, फ्रान्स, चीन, युनायटेड किंगडम, पाकिस्तान, भारत, इस्रायल आणि उत्तर कोरिया देशांकडे आण्विक शस्त्रे आहेत.
जगात रशिया आणि अमेरिकेकडे 90 टक्के आण्विक शस्त्रे आहेत. रशियाकडे तब्बल 5580 आण्विक शस्त्राचा साठा असून रशिया हा जगातील सर्वात मोठा देश आहे.
अमेरिकेकडे एकूण 5044 एवढे न्युक्लिअर बॉम्ब आहेत. जगात अमेरिका रशियापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आण्विक शस्त्र साठ्यात भारत हा सहाव्या क्रमांकाचा देश आहे. 2023 मध्ये भारताकडे 164 इतके अण्वस्त्रे होती, ती संख्या 2024 मध्ये 172 इतकी झाली आहेत.
पाकिस्तानकडे 170 एवढे आण्विक शस्त्राचा साठा आहे. आण्विक शस्त्र तयार करण्यात जगातील सातव्या क्रमांकाचा देश ठरला आहे. यासाठी पाकिस्तानने अंदाजे एक अब्ज इतका खर्च सुध्दा केला आहे.
चीन तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. चीनकडेे 500 आण्विक शस्त्रे आहेत. यामध्ये F-15,F-16 लढाऊ विमाने, डॉल्फिन-क्लास पाणबुडी, क्रूझ अशी क्षेपणास्त्रे आहेत.