Amol Sutar
भाजपचे केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी राहुल गांधी यांच्यावर 'न्याय यात्रे'वरुन टीका केली आहे.
काँग्रेसचे राहुल गांधी यांनी 'न्याय यात्रा' काढणार असल्याची घोषणा केली होती.
'न्याय यात्रा' नाही, 'ज्ञान यात्रा'ची गरज असल्याची टीका करत गिरिराज सिंह यांचा राहुल गांधींवर निशाणा साधला.
काँग्रेसची ही पदयात्रा 67 दिवसांत 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांचा पल्ला पार करणार आहे.
भाजप नेत्या स्मृती इराणी म्हणाल्या की, जे अन्यायासाठी ओळखले जातात ते न्याय करण्याचे नाटक करत आहेत.
नरेंद्र मोदी आज स्वामी विवेकानंदांच्या पावलावर पाऊल ठेवत आहेत, असे गिरिराज सिंह यांनी सांगितले.
काँग्रेसची न्याय यात्रा 14 जानेवारीला निघत आहे. त्याचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लवकरच राम मंदीराचे उद्घाटन होत आहे.
न्याय यात्रेने पुढे जायचे की ज्ञानयात्रेने पुढे जायचे हे राहुल गांधींना ठरवायचे आहे.
NEXT IAS Love Story: पती-पत्नी दोघेही कलेक्टर; लग्नासाठी बदलावं लागलं केडर, रंजक प्रेमकहाणी !