Aslam Shanedivan
ओडिशा प्रशासकीय सेवेतील अश्विनी कुमार पांडा यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे.
त्यांना जमिनीच्या रूपांतरण प्रकरणात लाचखोरीच्या आरोपाखाली अटक झाली आहे.
धक्कादायक म्हणजे अश्विनी कुमार पांडा हे ओडिशा प्रशासकीय सेवेतील 2019 च्या बॅचचे टॉपर आहेत.
ते संघर्षाची प्रेरणा देणारे आणि ‘काहीही अशक्य नाही’ असे म्हणत उर्जा देणारे अधिकारी अशी त्यांची ओळख होती
पण आता संबलपूरमध्ये तहसीलदार असताना लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. याच प्रकरणात त्यांच्या ड्रायव्हरला देखील अटक झाली आहे.
दक्षता अधिकाऱ्यांनी त्यांच्या मालमत्तेवर टाकलेल्या छाप्यात रोख रक्कम आणि दागिने जप्त केले आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
जमिनीच्या रूपांतरण प्रकरणात ड्रायव्हरमार्फत 15 रूपयांची लाच घेताना त्यांना झाली अटक झाली आहे. परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आश्विनी कुमार पांडा यांनी समाज माध्यमांवर पोस्ट केली होती. त्यामध्ये त्याने लिहिले होते की, 'जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा काहीही, अगदी काहीही अशक्य राहत नाही.