सरकारनामा ब्यूरो
आयएएस प्रणिता दास या ओडिशाच्या मयूरभंजमधील बारीपाडा येथील आहेत.
बारीपाड्यात पाचवीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर भुवनेश्वरमधून बारावीपर्यंत शिक्षण घेतले.
कोलकाताच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून त्यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्याचवेळी त्यांनी यूपीएससी द्यायचे ठरवले होते.
ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्याच विषयात मास्टर्स करण्यासाठी त्या लंडनला गेल्या. तेथील जगप्रसिद्ध केंब्रिज विद्यापीठात त्यांनी प्रवेश घेतला.
एम फिल करताना विद्यापीठाकडून त्यांना शिष्यवृत्ती मिळाली. तेथून यूपीएससीची परीक्षाही द्यायला सुरुवात केली.
यूपीएससीच्या पहिल्या आणि दुसऱ्या प्रयत्नात त्यांना अपयश आले तरी त्यांनी हार न मानता अभ्यास सुरू ठेवला.
तयारी करताना सकाळच्या वेळी एम फिल आणि संध्याकाळी यूपीएससीचा अभ्यास त्या करत असत.
दिनचर्येत सातत्य ठेवत प्रणिता यांनी 2020 मध्ये तिसऱ्या प्रयत्नात यश मिळवले. पण हवे ते पद त्यांना मिळाले नाही.
पुढील वर्षात पुन्हा एकदा यूपीएससीची परीक्षा दिली. 42व्या रँकसह उत्तीर्ण झाल्या आणि अशाप्रकारे त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.
R