Vijay Shivtare : मुख्यमंत्री शिंदेंचे विश्वासू, अजितदादांचे कट्टर विरोधक विजय शिवतारे...

Sunil Balasaheb Dhumal

पुरंदरचे माजी आमदार, माजी मंत्री विजय शिवतारे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे विश्वासू मानले जातात.

Vijay Shivtare | Sarkarnama

2019 च्या विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शिवतारेंना ठरवून पाडले. त्यावेळीपासून शिवतारे-अजित पवारांतून विस्तवही जात नाही.

Vijay Shivtare | Sarkarnama

आता लोकसभेच्या माध्यमातून शिवतारे अजित पवारांचा बदला घेण्याच्या तयारीत आहेत.

Vijay Shivtare | Sarkarnama

लोकसभेत बारामतीतून अपक्ष म्हणून उभे राहण्याच्या भूमिकेमुळे महायुतीतील अजित पवार गटाने थेट मुख्यमंत्री शिंदेंनाच ठाण्यातून आव्हान देण्याची भाषा केली.

Vijay Shivtare | Sarkarnama

या पार्श्वभूमीवर भेटीसाठी आलेल्या विजय शिवतारेंना मुख्यमंत्री शिंदेंनी तब्बल सहा तास थांबवून ठेवले. मात्र, त्यानंतर झालेल्या चर्चेत त्यांनी आपली बाजू मांडली.

Vijay Shivtare | Sarkarnama

शिवतारेंचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर दोन दिवसांत पुन्हा चर्चा करण्याचे मुख्यमंत्री शिंदेंनी आश्वासन दिले आहे.

Vijay Shivtare | Sarkarnama

शिंदेंच्या सूचनेनुसार शिवतारे दोन दिवस शांत राहणार असले तरी लोकसभा निवडणूक लढवून ते अजित पवारांचा बदला घेणार का, याकडे लक्ष आहे.

R

Vijay Shivtare | Sarkarnama

NEXT : राहुल गांधींने घेतले त्र्यंबकेश्वरच्या महादेवाचे दर्शन

येथे क्लिक करा