सरकारनामा ब्यूरो
2015 बॅचचे IAS अमृत ऋतुराज हे ओडिशाच्या कोरापूट येथील असून, त्याच केडरचे ते अधिकारी आहेत.
राज्याच्या जाजपूर जिल्हा शाळेतून दहावी पूर्ण केली. तेथील रेवेन शॉ विद्यापीठातून त्यांनी उच्च शिक्षण घेतले.
नवी दिल्लीच्या JNU मधून प्रतिष्ठित स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज (SIS) मधून आंतरराष्ट्रीय संबंधात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
आयएएस ऋतुराज यांनी 650 व्या रँकसह यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण केली होती.
ऋतुराज हे ओडिशाच्या कामगार आयुक्त पदावर कार्यरत असताना उल्लेखनीय कामासाठी त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे.
कामगार आयुक्तव्यतिरिक्त त्यांची ढेंकनाल जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सामाजिक विषयातील शैक्षणिक पार्श्वभूमी असल्याने जनतेतील तळागाळात जाऊन काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची राज्यात विशेष ओळख आहे.
Odisha Administrative Service (OAS) अधिकारी अमृता प्रियंबदा मिश्रा यांच्याशी त्यांनी नुकताच विवाह केला.