प्रसन्न जकाते
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. शर्वरी या वकील आहेत. त्या देखील शेतकरी आंदोलनात सक्रिय झाल्या आहेत.
शर्वरी तुपकर यांनी रविकांत तुपकर यांना अटक झाल्यानंतर आंदोलन केले. रेल्वेरोकोचाही प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
रविकांत तुपकर यांना अटक झाल्यानंतर शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाण्यात पोलिस स्टेशनबाहेर आक्रमक आंदोलन करण्यात आले.
तुपकर यांना अटक झाल्यानंतर रेल्वे स्टेशनजवळ पोहोचलेल्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
अटक झाल्यानंतर रविकांत तुपकर यांनी रेल्वेरोको आंदोलन कार्यकर्ते करतील असा इशारा दिला होता.
ठरल्याप्रमाणे तुपकर यांना अटक झाल्यानंतर रेल्वेरोको करण्यासाठी शेतकरी जिल्ह्यातून गोळा झाले होते.
रविकांत तुपकर आणि त्यांच्या समर्थकांवर पोलिस सातत्याने पाळत ठेऊन होते. त्यानुसार कार्यकर्त्यांची माहिती घेत गुन्हा नोंदविण्यात आला.
तुपकर यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या पत्नी शर्वरी यांनी हे आंदोलन ‘लीड’ केले. वकील असल्याने त्या पती रविकांत यांच्यासाठी न्यायालयातही लढा देतात.