3 वर्षे PF खातं वापरलं नाही तरी पैसे बुडणार नाहीत? जाणून घ्या व्याज आणि निष्क्रिय खात्याचे नियम

Aslam Shanedivan

PF खाते

नोकरी सोडल्यानंतर किंवा दुसऱ्या कंपनीत रुजू झाल्यानंतर आपले जुने पीएफ खाते बरेचजण पाहत नहीत. त्या खात्यावरील व्याज मिळणे बंद झाले असेच अनेकांना वाटते.

EPFO | Sarkarnama

व्याज थांबत नाही

मात्र हा समज चुकीचा आहे. EPFO च्या नियमांनुसार, केवळ तीन वर्षे पैसे जमा झाले नाहीत म्हणून पीएफ खाते बंद होत नाही किंवा त्यावरील व्याज थांबत नाही.

EPFO | Sarkarnama

व्याज मिळते

कर्मचाऱ्याने वयाची 55 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी नोकरी सोडली, तर त्याच्या PF खात्यातील जमा रकमेवर नियमानुसार वयाची 58 वर्षे पूर्ण होईपर्यंत व्याज मिळू शकते.

EPFO | Sarkarnama

याची माहिती घ्यावी

यामुळे PF खातेदारांनी आपले निष्क्रिय खाते कधी निष्क्रिय होते? त्यावर व्याज जमा का केले जात नाही, याची माहिती जाणून घेणे गरजेचं आहे

EPFO | Sarkarnama

पीएफ खाते निष्क्रिय

वयाची 55 वर्षे पूर्ण झाल्याने निवृत्तीनंतर 36 महिन्यांच्या आत पीएफची रक्कम काढली नाही, तर खाते निष्क्रिय होऊ शकते.

EPFO | Sarkarnama

स्थलांतर

परदेशात कायमस्वरूपी स्थलांतर झाल्याने निर्धारित कालावधीत पीएफची रक्कम काढली नाही, तर खाते निष्क्रिय होऊ शकते.

EPFO | Sarkarnama

खातेदाराचा मृत्यू

खातेदाराच्या मृत्यूनंतर नॉमिनी किंवा कायदेशीर वारसांनी 36 महिन्यांच्या आत दावा केला नाही, तर खाते निष्क्रिय होऊ शकते.

EPFO | Sarkarnama

पेमेंट अयशस्वी होणे

चुकीच्या बँक तपशीलांमुळे पैसे परत आल्यास आणि 36 महिन्यांच्या आत दावा केला नाही, तर खाते निष्क्रिय होऊ शकते.

EPFO | Sarkarnama

तुमच्या मतदारसंघाचे चित्र बदलणार? डिलिमिटेशनमुळे गावातील राजकारणाला नवे वळण; जाणून घ्या फायदे!

आणखी पाहा