Roshan More
राजस्थान मधील कोटा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार ओम बिर्ला 17 व्या लोकसभेचे अध्यक्ष होते.
ओम बिर्ला यांच्या कार्यकाळात महिला आरक्षण, कलम 370, क्रिमीनल लाॅ या सारखे महत्वाची बिले पास झाली.
सभागृहाला अनेक प्रसंगी संतुलित आणि न्याय्य पद्धतीने मार्गदर्शन केले आहे, यासाठी मी तुमचे कौतुक करतो, असे मोदी म्हणाले.
विरोधीपक्षातील खासदारांना बोलण्यासाठी लोकसभा अध्यक्ष पुरेसा वेळ देत नाही, असा आरोप विरोधी पक्षाकडृन करण्यात आला आहे.
1300 तास सभागृहाचे कामकाज
16 व्या लोकसभेचे कामकाज 1600 तास चालले होते. त्या तुलनेत 17 व्या लोकसभेचे काम 1300 तास चालले. लोकसभेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. दोन युवकांनी लोकसभेमध्ये घुसखोरी केली.
लोकसभा अध्यक्षांनी सत्ताधारी पक्षातील खासदारांना अभय दिले तर, विरोधीपक्षातील खासदारांवर निलंबणाची कारवाई केल्याचा आरोप रमेश बिधुरी प्रकरणात करण्यात आला.
17 व्या लोकसभेमध्ये उपाध्यक्ष नेमण्यासाठी निवडणुक घेण्यात आली नाही. उपाध्यक्ष पदासाठी निवडणुक घेण्याचा अधिकारी लोकसभा अध्यक्षांना असतो.