Mayur Ratnaparkhe
ओमप्रकाश राजभर यांची उत्तर प्रदेशातील सुहेलदेव भारतीय समाज पक्षाच्या (सुभासपा) अध्यक्षपदी पुन्हा एकदा निवड झाली आहे.
ओमप्रकाश राजभर यांची निवड करण्यात आल्याचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि मुख्य प्रवक्ते अरुण राजभर यांनी सांगितले.
ओमप्रकाश राजभर सध्या एनडीएमध्ये आहेत आणि यूपीच्या योगी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आहेत.
राजभर यांना पुन्हा पक्षनेते बनवण्यासोबतच सुभासपने आपले निवडणूक चिन्हही बदलले आहे.
लखनऊ येथे झालेल्या पक्षाच्या बैठकीत पक्षाचे निवडणूक चिन्ह म्हणून 'काठी' ऐवजी 'चावी' करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पक्षाचे पुन्हा अध्यक्ष झाल्यानंतर ओमप्रकाश राजभर यांनी आधीच्या सरकारांवर निशाणा साधला.
ओमप्रकाश राजभर यांनीही पुढील वर्षी बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत जोरदारपणे लढण्याची घोषणा केली.
जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुकीची तयारी आतापासूनच सुरू करा आणि पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरा, असे आवाहन त्यांनी केले.
सुभासपा हा गरीब, वंचित, मागास, दलित, अल्पसंख्याक, पीडितांचा पक्ष आहे, त्यामुळे पक्षाच्या चळवळीत सक्रिय भूमिका बजावत असल्याचे ते म्हणाले.