Vijaykumar Dudhale
माळशिरसच्या सभेत जयंत पाटील यांनी उत्तम जानकर यांच्या विधानसभा उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.
महाविकास आघाडीत अद्याप जागा वाटपाबाबत चर्चा झालेली नाही. त्यामुळे माळशिरसमधून आत्ताच उमेदवार घोषित करणे उचित ठरणार नाही. पण, उत्तम जानकरांनी आता महाराष्ट्रभर फिरले पाहिजे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर आमच्याकडे आता चांगले वक्ते, नेते राहिले नाहीत. आम्ही नवीन नेतृत्व, नेते तयार करण्यावर भर देत आहोत. त्यामुळे उत्तम जानकर यांनी सातारा, सोलापूर, सांगलीसह राज्यभर फिरावे. तुम्ही येथून 400 टक्के निवडून याल, यात काही वाद नाही.
लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे सरकार घाबरलेले आहे. ज्यांनी ९ अर्थसंकल्प मांडले त्यांनी दहाव्या अर्थसंकल्पावेळी तिजोरीचे दारच काढून टाकले
ढीगभर घोषणा करूनही विधानसभा निवडणुकीबाबत महायुतीच्या नेत्यांना आत्मविश्वास वाटत नाही. त्यातून स्वतःची जाहिरात करण्यासाठी त्यांनी २७० कोटी रूपये राखून ठेवले आहेत.
लाडकी बहीण योजनेसाठी आलेले 10 लाख अर्ज हे सत्तेवर पुन्हा आले तर दीड लाखही करू शकतात
जालनातील एका रस्त्याचे ११ हजार कोटीचे टेंडर १५ हजार कोटींना दिले आहे. विरारहून आलिबाग रस्त्याचे २० हजार कोटींचे टेंडर आता २६ हजार कोटींना जाण्याची माहिती आहे. एका किलोमीटरला २०० कोटीहून अधिक खर्च होणार आहे. त्यामुळे एवढे पैसे त्यांच्याकडे आले कुठून, असा प्रश्न आहे
मोहोळला एकत्रित मिळून एक उमेदवार ठरवा, जो 100 टक्के विजयी होईल, असा उमेदवार निवडा, आपल्या मागे शरद पवार यांची ताकद आहे