Omraje Nimbalkar : ओम राजेनिंबाळकरांच्या सात मागण्या कोणत्या? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना साकडे

Roshan More

ओम राजेनिंबाळकर

मुंबई येथील नंदनवन येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब यांची खासदार ओम राजेनिंबाळकर यांनी सदिच्छा भेट घेतली.

मागण्याचे निवेदन

ओम राजेनिंबाळकर यांनी धाराशिव लोकसभा मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्न तसेच जनहिताच्या मागण्यांचे निवेदन उपमुख्यमंत्री शिंदेंना सादर केले.

मागण्या

टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून CSR निधी तसेच राज्य शासनाच्या सहकार्याने धाराशिव लोकसभा मतदारसंघात आधुनिक स्किल डेव्हलपमेंट सेंटर सुरू करण्यात यावे, जेणेकरून स्थानिक युवक-युवतींना उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.

सिंचन प्रकल्पांना गती

कृष्णा–मराठवाडा सिंचन प्रकल्पास राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देऊन आवश्यक निधीची तरतूद करण्यात यावी. ७ टीएमसी पाण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद करून प्रकल्पाची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत.

MP Omraje Nimbalkar | Sarkarnama

पीकविमा निकषांमध्ये बदल

पिकविम्यातून वगळलेले ट्रिगर पुन्हा लागू करून शेतकऱ्यांना पिकविम्याचा लाभ मिळावा, यासाठी विमा कंपनीच्या निकषांमध्ये आवश्यक बदल करण्यात यावेत.

MP Omraje Nimbalkar | Sarkarnama

उपविभागीय कार्यालय

महावितरण कार्यालयाचे विभाजन करून वैराग येथे स्वतंत्र उपविभागीय कार्यालय सुरू करण्यात यावे.

Eknath Shinde | Sarkarnama

शेतकऱ्यांना आर्थिक मदत

शेतजमीन खरवडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळालेली नसल्याने त्यांना तातडीने आर्थिक मदत वितरित करण्यात यावी.

Eknath Shinde | Sarkarnama

जलसाठा योजना

मांजरा व तेरणा नदीवरील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे रूपांतर बॅरेजेसमध्ये करून जलसाठा वाढविण्याची योजना राबविण्यात यावी.

Eknath Shinde | Sarkarnama

NEXT : सरकारविरोधात शिक्षकांचा आझाद मैदानावर एल्गार! काय आहेत प्रमुख मागण्या?

Teachers Protest at Azad Maidan
येथे क्लिक करा