Jagdish Patil
रशिया-युक्रेन युद्ध जवळपास 3 वर्षांपासून सुरू आहे. दोन्ही देशातील संघर्ष संपावा यासाठी अमेरिकेने संयुक्त राष्ट्रात युद्धबंदीचा प्रस्ताव मांडला होता.
अशातच शुक्रवारी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात व्हाइट हाऊसमध्ये चर्चा झाली.
दोन्ही राष्ट्रपती व्हाइट हाऊसच्या ओव्हल हाऊसमध्ये येताच झेलेन्स्कींनी ट्रम्प यांना युद्धाचे भयानक फोटो दाखवले.
त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेत झेलेन्स्कींनी पुतिन यांच्याशी कोणत्याही प्रकारच्या तडजोडीसाठी तयार नसल्याची भूमिका घेतली.
झेलेन्स्कींनी घेतलेल्या भूमिकेमुळे चर्चेदरम्यान ट्रम्प उपाध्यक्ष जेडी व्हेन्स आणि झेलेन्स्की यांच्यात जोरदार शाब्दीक चकमक झाली.
ट्रम्प म्हणाले, "तुमची भूमिका तडजोड करण्याचा नाही आणि तुम्ही रशियाविरोधात युद्ध जिंकू शकत नाही, मी मध्यस्ती केली नाही तर युद्धविराम होऊ शकत नाही."
युक्रेनचेकडे आमची लष्करी उपकरणे नसती तर हे युद्ध दोन आठवड्यात संपलं असतं, असंही ट्रम्प म्हणाले.
व्हेन्स यांनी झेलेन्स्कींवर अमेरिकेचा अपमान केल्याचा तर ट्रम्प यांनी तिसऱ्या महायुद्धावर जुगार खेळल्याचा आरोप केला.
या सर्व प्रकरणार प्रतिक्रिया देताना झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे पाठिंब्याबद्दल आभार मानले आणि युक्रेनला शांतता फक्त हवी असल्याचं स्पष्ट केलं.