Aslam Shanedivan
आज जागतिक महिला दिवस असून जगाच्या पाठीवर महिलांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला आहे. त्या राजकारणातही मागे नाहीत.
देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीच्या तख्तावर देखील चार महिलांनी मुख्यमंत्री म्हणून राज केलं आहे. तसेच विविध 14 राज्यांच्या कारभार महिलांनी साभाळला आहे
यात सध्याच्या भाजपच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासह आपच्या आतिशी, कांग्रेसच्या शीला दीक्षित आणि भाजपच्या सुषमा स्वराज यांची नावे आहेत.
1963 मध्ये सुचेता कृपलानी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. भारतात पहिल्यांदाच महिला मुख्यमंत्री झाल्या
ओडिशाच्या आयर्न लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नंदिनी सत्पथी ओडिशाच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. त्या त्यांच्या 52 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकही निवडणूक हरली नाही.
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसने राज्यात मजबूत पकड मिळवली असून त्या येथील मुख्यमंत्री आहेत.
तामिळनाडूच्या दीर्घकाळ मुख्यमंत्री जयललिता यांनी राज्य केले आहे. त्यांच्या अनेक योजना आजही सुरू आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये मायावतींनी दलित राजकारणाला एक नवीन दिशा दिली. त्यांनी येथे बहुजन समाज पक्ष (बसपा) मजबूत केला.
राजस्थानमध्ये वसुंधरा राजे दोनदा मुख्यमंत्रिपदावर होत्या. त्यांनी महिला सक्षमीकरणात योगदान दिले.