Rashmi Mane
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रुक्मिणीची विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न झाली.
एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक पूजा केली.
शिंदे यांनी आषाडी एकादशीनिमित्त सलग तिसऱ्यांदा पूजा केली.
यावेळी त्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी लता शिंदे, मुलगा डॉ. श्रीकांत, सून वृषाली, नातू रुद्रांश उपस्थित होते.
तसेच केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, मंत्री गिरीश महाजन, तानाजी सावंत, चंद्रकांत पाटील आणि दीपक केसरकर ही या पूजेला उपस्थित होते.
यंदा नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी बाळू शंकर अहिरे आणि आशाबाई बाळू अहिरे यांना मानाचे वारकरी म्हणून शासकीय पूजेला बसण्याचा मान मिळाला.
यावेळी बोलताना विठुरायाच्या चरणी लीन होत राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव, राज्यातील बळीराजाचे दुःख कष्ट दूर करून त्याला सुजलाम सुफलाम ठेव, राज्यात उत्तम पाऊस पडून सर्वांना दिलासा दे एवढेच मागणे याप्रसंगी विठुरायाच्या चरणी शिंदे यांनी मागितले.