Rashmi Mane
अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी जेडी व्हॅन्स यांना उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
39 वर्षीय जेडी व्हॅन्स हे लेखक आहेत आणि 2023 पासून ओहायोचे सिनेटर देखील आहेत.
पण सध्या त्यांच्यापेक्षा त्यांची पत्नी उषा चिलुकुरी या जास्त चर्चेत आहेत.
उषा चिलुकुरी ही कॅलिफोर्नियामध्ये वाढलेल्या भारतीय वंशाच्या आहेत.
येल विद्यापीठात शिकत असताना त्यांची जेडी व्हॅन्स यांच्याशी भेट झाली. दोघांनी 2014 मध्ये लग्न केले.
उषा एका नॅशनल फर्ममध्ये वकील आहेत. त्यांनी येल विद्यापीठात इतिहासाचा अभ्यास केला आणि केंब्रिज विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीही घेतली आहे.
जेडी व्हॅन्स एक लेखक, रिपब्लिकन सिनेटर आणि आता उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार, त्यांच्या या संपूर्ण प्रवासात त्यांची पत्नी उषा या त्यांच्यासोबत आहेत.
उषा आणि जेडी व्हॅन्स यांना तीन मुले आहेत. त्यांच्या मुलांचे नाव इवान आणि विवेक आहे, तर मुलीचे नाव मीराबेल आहे.