Rashmi Mane
22 एप्रिल रोजी पहलगामजवळ झालेल्या हल्ल्याला आज एक महिना झाला, पण दहशतवाद्यांचा ठावठिकाणा अजून लागलेला नाही.
चार दहशतवाद्यांचा अद्याप पत्ता लागलेला नाही, हल्ल्याच्या 24 तासांच्या आत तपास यंत्रणांनी या आरोपींचे रेखाचित्र जारी केले होते.
परंतु 30 दिवसांनंतरही, कारवाई कुठपर्यंत पोहोचली आहे आणि हे दहशतवादी अद्याप का पकडले गेले नाहीत, हा प्रश्न कायम आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांच्या शोध मोहीम चालूच आहे. पण आता हे ऑपरेशन पहलगामपासून दक्षिण आणि मध्य काश्मीरच्या घनदाट जंगलांपर्यंत पसरले आहे. हा शोध आता "गवताच्या गंजीतील सुई शोधणे" सारखे आव्हान बनले आहे.
गुप्तचर सूत्रांचे म्हणणे आहे की हा दहशतवादी हल्ला एका सुनियोजित कटाचा भाग म्हणून करण्यात आला होता.
दहशतवादी आधीच एखाद्या मजबूत आणि सुरक्षित ठिकाणी लपले असल्याची भीती आहे. त्यांनी कदाचित त्यांची शस्त्रे सोडून दिली असतील, रेशन आणि इतर आवश्यक वस्तूंचा साठा केला असेल.
आता ते पूर्णपणे लपले आहेत दाट जंगले आणि खडबडीत भूभाग यामुळे ऑपरेशन अधिक गुंतागुंतीचे होत आहे.
सुरक्षा यंत्रणा सतत लोकांशी संपर्कात आहेत. स्थानिकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण त्यात फारशी प्रगती नाही.