Rashmi Mane
आपण ज्या देशाबद्दल बोलतो आहोत तो म्हणजे स्विट्झरलंड – एक लोकशाही प्रणाली असलेला देश आहे. जिथे राष्ट्रपतींचा कार्यकाळ फक्त एक वर्ष असतो!
स्विट्झरलंडमध्ये 7 सदस्यीय फेडरल कौन्सिल कार्यकारी सत्ता चालवते. या कौन्सिलमधील एक सदस्य दरवर्षी राष्ट्रपती म्हणून निवडला जातो.
फक्त 1 वर्षाचा कार्यकाळ ठेवण्यामागील हेतू म्हणजे सत्ता केंद्रीकरण टाळणे आणि सामूहिक नेतृत्वाला प्रोत्साहन देणे.
स्विस राष्ट्रपतीची भूमिका मुख्यतः प्रतीकात्मक असते. ते परदेशी पाहुण्यांचे स्वागत करणे, बैठकांना अध्यक्षता करणे हे त्यांचे प्रमुख काम करतात.
स्विट्झरलंडमध्ये निर्णय प्रक्रिया ही पूर्ण फेडरल कौन्सिलमार्फत चालते. राष्ट्रपती एकटे निर्णय घेत नाहीत – त्यामुळे सत्तेचा दुरुपयोग टाळला जातो.
दरवर्षी पार्लमेंटकडून रोटेशन पद्धतीने एका नवीन सदस्याची राष्ट्रपती म्हणून निवड केली जाते. त्यामुळे सत्तेची चक्रे फिरत राहतात.
भारतामध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाळ 5 वर्षांचा असतो, पण भूमिका ही मुख्यतः प्रतीकात्मकच असते – जशी स्विट्झरलंडमध्ये.
स्विट्झरलंडचा 1 वर्षाचा राष्ट्रपती कार्यकाळ जगभरात वेगळा आहे.