Rashmi Mane
यूपीएससीसारखी देशातील सर्वात कठीण परीक्षा पास करणं सोपं नाही, पण तस्कीन खान यांनी हे शक्य करून दाखवलं. त्या 'ब्यूटी विथ ब्रेन'चं उत्तम उदाहरण आहे.
मॉडेलिंगच्या दुनियेत चमकणाऱ्या तस्कीन खानने मेहनतीने यूपीएससी परीक्षा पास करून तरुणांसाठी आदर्श निर्माण केलं आहे.
2016-17 मध्ये मिस देहरादून आणि मिस उत्तराखंडचा किताब मिळवलेल्या तस्कीनने 2022 मध्ये यूपीएससीमध्ये 736 वी रँक मिळवली.
तस्कीनचा मिस इंडिया बनण्याचा स्वप्न मार्गातच थांबला, कारण वडिलांच्या निवृत्तीनंतर आर्थिक संकट समोर उभं राहिलं.
सायन्स स्ट्रीममधून 10वी व 12वी उत्तीर्ण करताना तिने 90% पेक्षा जास्त गुण मिळवले आणि एनआयटीसाठी प्रवेश परीक्षा ही पास केली.
शाळा-कॉलेजमध्ये बास्केटबॉल चॅम्पियन, राष्ट्रीय स्तरावरील डिबेटर आणि व्यावसायिक मॉडेल म्हणून ओळख निर्माण केली.
एक इंस्टाग्राम फॉलोवरने तिला यूपीएससीबद्दल माहिती दिली आणि तिथून तिचा आयएएस होण्याचा प्रवास सुरू झाला.
2020 मध्ये जामिया मिलिया इस्लामियाची फ्री कोचिंग मिळाल्यावर ती दिल्लीला गेली, जिथे तिने प्रचंड मेहनत घेतली.